-
Kadambari Garad | Ball Pen Painting by Vishal Garad
खूप भारी अनुभव होता तिला पुन्हा कागदावर जन्माला घालतानाचा. जेव्हा संपुर्ण चित्र तयार झाले तेव्हा तिच्या डोळ्यात हरवून जाण्याचा आनंद एका बापासोबत माझ्यातल्या चित्रकारालाही सुखावणारा होता. लेकीच्या डोळ्यात पाहिलं की सगळा शिन विसरून प्रचंड मेहनत करण्याची उर्मी निर्माण होते. भाग्यवान असतात ते ज्यांच्या पोटी ही गोड जबाबदारी जन्म घेते.
Name : Kadambari
Artist : Vishal Garad
Material : Ball Pen on paper
Reference : Photo
Type : Free Hand
Time required : 5 hrs
Date : 18 Dec 2020 -
दैना | Dainna | Shortfilm | Official Release | Vishal Garad | Ingit Production
Dainna shortfilm based on millions of true lockdown stories. This film focused on how poor peoples suffering in lockdown situation. The film coments on employment, education, health and livelihood.
🎬 Movie credits :
Written & Directed by : Vishal Garad
Produced by : Ingit Production
Director of Photography : Amol Lohar
Screenplay & Dialogues : Vishal Garad
Background score : Rabbana
Editor : Amol Lohar
Sound Design : Maruti Lohar
Costume Design : Vira Garad
Make up : Balaji Kale
Production Manager : Hanumant Hipparkar
Lead Cast : Vishnu & Rukhmini Lohar
© copyrights : Ingit Production -
इंगित प्राॅडक्शन | Ingit Production | Announcement by Vishal Garad
माझा जन्म अनेक गोष्टी करण्यासाठी झाला आहे. आजवर मी जे जे काही केले त्या सर्व कालाप्रकारांना तुम्ही प्रेम दिलंय. व्याख्याने, बॉलपेन चित्र, पुस्तके, कविता, कॅलिग्राफीज या माध्यमातून मी व्यक्त होत आलोय. हे सगळे करत असताना माझ्याकडून आणखीन एक अपेक्षा तुम्ही सतत ठेवत आलात. तीच अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आज मी इंगित प्राॅडक्शन हाऊसची निर्मिती केली आहे. या बॅनरची प्रत्येक कलाकृती तुमचे मनोरंजन करण्यास सज्ज असेल. आजपर्यंत माझ्या डोक्यातल्या कल्पना माईकवर बोललोय, कागदावर लिहिल्यात, चित्रात उतरवल्यात पण आता सज्ज झालोय त्या पडद्यावर साकारण्यासाठी. तूर्तास 'इंगित' लक्ष्यात ठेवा, बाकी काळजावर कोरले जाईल याची गॅरंटी देतो.
काही गोष्टी आपण स्वतः ठरवून करत असतो तर काही गोष्टी समाज आपल्यातला हुनर ओळखून करायला भाग पाडत असतो. माझ्यासारख्या सर्वसामान्य युवकाला चित्रपट निर्मितीत पाऊल टाकायला प्रवृत्त करणारे तुम्हीच आहात. पुस्तकांच्या प्रोमोशनसाठी व्हिडीओच्या माध्यमातून भन्नाट संकल्पना राबवत राबवत हा प्रवास चित्रपट निर्मितीपर्यंत येईल असे कधी वाटले नव्हते पण कदाचित नियतीला माझ्या डोक्यातून काहीतरी उपसून मोठ्या पडद्यावर उमटवायची खुमखुमी आली असावी म्हणूनच इंगितच्या निर्मितीचा विचार माझ्या डोक्यात घातला असावा पण ते काहीही असो आता इंगित एंटरटेनमेंटच्या माध्यमातून ठिणगी तर पडलीच आहे यावर फक्त तुमच्या प्रेमाची फुंकर टाकत राहा. हा पेटलेला निखारा कधीच विझणार नाही.
विशाल विजय गरड
निर्माता : इंगित प्राॅडक्शन
Ingit Films
Ingit Production
Ingit Entertainment
Date : 29 August 2020 -
व्हय ! मलाबी लेखक व्हायचंय | पुस्तक प्रकाशन सोहळा | Author Vishal Garad
पुस्तकाचा लेखक म्हणून व्हय ! मलाबी लेखक व्हायचंय या पुस्तकाचे आज प्रकाशन झाले असे जाहीर करतो. आजचे आगळे वेगळे पुस्तक प्रकाशन कसे झाले हे सविस्तर लिहिण्यापेक्षा ते तुम्हाला पाहण्यासाठी या चित्रफितीत अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत चित्रित केले आहे. हे पुस्तक आता सज्ज झालंय तुमच्या घराचा उंबरा ओलांडण्यासाठी आणि तुम्हाला तुमच्या स्वप्नापर्यंत घेऊन जाण्यासाठी. आजपासून हे पुस्तक amazon या जगातल्या सर्वात मोठ्या ऑनलाईन स्टोअरवर उपलब्ध झाले आहे लगेच ऑर्डर करा किंवा पोस्टाने मिळवण्यासाठी संपर्क करा ७०२०९४१२४४ या नंबरवर.
लेखक : प्रा.विशाल गरड
दिनांक : २५ जुलै २०२० -
व्हय मलाबी लेखक व्हायचंय (Vhay malabi lekhak vhayachay) Official trailer | The Book | Vishal Garad
हे स्वप्न बाळगलेल्या प्रत्येकासाठी हे पुस्तक एक वाट आहे, याला वाचल्यानंतर तुम्ही ठरवलेली गोष्ट घडण्याची शक्यता दाट आहे. यातला प्रत्येक शब्द न शब्द माझ्या हृदयातून थेट आहे. विश्वासाने सांगतोय दोस्तांनो, तुमचे स्वप्न पूर्ण करण्याचा या पुस्तकात 'नेट' आहे.
लेखक : प्रा.विशाल गरड -
छत्रपती शिवाजी महाराज | प्रा.विशाल गरड यांचे व्याख्यान | शिवचरित्र
०२ मे २०१५ साली चिखर्डे येथे संपन्न झालेल्या प्रा.विशाल गरड यांच्या शिवचरित्रपर व्याख्यानातला निवडक भाग सदरच्या व्हिडिओत प्रदर्शित करण्यात आला आहे.
Motivational speech by Vishal Garad on Chatrapati Shivaji Maharaj.
संपर्क : 8888535282 -
तरुणाईच्या दशा आणि दिशा | विजेता टाइम्स | Live Session
प्रा.विशाल गरड यांनी विजेता टाइम्स या फेसबुक पेजवरून युवकांशी साधलेला संवाद. Vishal Garad Facebook Live on 12 May 2020 -
प्रा.विशाल गरड यांची 'आयुष्य' कविता | हृदयांकित काव्यसंग्रहातून
A Poem on life by Poet Vishal Garad -
प्रवासातली छोटी मुलाखत | प्रा.विशाल गरड आणि अमोल लोहार | गप्पा गोष्टी
व्याख्यानाला जाता जाता सिनेमॅटोग्राफर अमोल लोहार यांनी प्रवासादरम्यान प्रा.विशाल गरड यांची गाडीत घेतलेली एक छोटी मुलाखत. (Vishal Garad interviewed while traveling by Amol Lohar) -
प्रा.विशाल गरड यांचा युवा संवाद | महाराष्ट्र बातमी
विषय : 'गरज महापुरुषांचा इतिहास पुन्हा चाळण्याची'
सहभाग : प्रा.विशाल गरड (वक्ते, लेखक, कवी, चित्रकार)
सौजन्य : महाराष्ट्र बातमी फेसबूक पेज
दिनांक : २५ एप्रिल २०२० -
Maza Bhimraya | My singing tribute to B.R.Ambedkar.
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त 'माझा भीमराया' हे गाणे गाऊन त्यांना प्रा.विशाल गरड यांची स्वर आदरांजली.
दिनांक : १४ एप्रिल २०२० -
प्रा.विशाल गरड | शिवचरित्र संकलित भाग | कर्मवीर भाऊराव पाटील
कर्जत ता.अहमदनगर येथे झालेल्या शिवचरित्रपर व्याख्यानात प्रा.विशाल गरड यांनी सांगितलेला कर्मवीर भाऊराव आण्णा पाटील यांच्या आयुष्यातला एक ह्रदयस्पर्शी वास्तव प्रसंग.
Vishal Garad
Home Videos