प्रथतः तुम्हा सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा ! कोरोनाच्या या अंधारमय वातावरणात आपण दिवा लावायला सहीसलामत राहिलो हेच सर्वात मोठं गिफ्ट आहे. फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर आणि व्हाट्सएपवर माझ्याशी कनेक्ट राहिलेल्या मित्रांना मी कधीच आभासी मानत नाही. प्रत्यक्ष भेट सोडली तर आपण एकमेकांना खूप जवळून ओळखत असतो, सुख दुःखात सहभागी होत असतो. याचे कितीतरी अनुभव मी रोजच्या आयुष्यात घेत...
प्रसिद्ध फोटोग्राफर सचिन प्रताप नलावडे यांनी आज माझ्या पांगरी येथील निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. सर्वसामान्य चेहऱ्यांना स्वतःच्या हटके अशा सचिन स्टाईलने कॅमेऱ्यात कैद करून त्यावर एडिटिंगचे शिंपडन मारून त्या चेहऱ्यांना ग्लॅमरस लूक प्रदान करणारा हा अवलिया टॅलेंटचा बादशहा आहे. फोटोग्राफीसाठी फक्त स्किल असून उपयोग नाही त्यासोबत तशी यंत्र सामग्री सुद्धा असावी लागते म्हणजे फोटोग्राफीला न्याय देता येतो....

© तार

पंकज भावा मन जिंकलंस या फ्रेमनं, तुझी तार पाहून हृदयाची तार छेडली गेली यार. ही कलाकृती पाहायला स्व.यादवराव सोनवणे असायला हवे होते ही खंत तुलाही असेलच म्हणा पण असो तुझा हा शंभर नंबरी प्रयत्न मला फार आवडला. तुझ्या शॉर्टफिल्म मध्ये नागराज आण्णा आहेत म्हणून तिचे वेटेज असणारच पण भावा लेखक आणि दिग्दर्शक म्हणून तू 'तार' साठी जे...
आज माझ्या मुलीला सात महिने पूर्ण झालेत, सध्या दिसेल त्या वस्तूला धरून उभे राहण्यासाठी तिची धडपड सुरू आहे. विरा जेवायला जाताना 'ओ, लक्ष द्या जरा तिच्याकडे असे सांगून गेली. मी देखील दोन तीन खेळणी तिच्यापुढे टाकून तिच्या हालचालींचे निरीक्षण करत बसलो. आपण म्हणतो मोठ्यांचे संस्कार लहानांवर होत असतात पण लहानांचे बारिक निरीक्षण केले तर ते सुद्धा अपल्यावर...
माझे मित्र ज्ञानेश्वर जाधवर लिखित लॉक डाऊन ही कादंबरी आज वाचून पूर्ण झाली. गेल्या नऊ महिन्यांपासून आपण सर्वजण या कोरोनाच्या वातावरणात जगत आहोत या दरम्यान प्रत्येकानेच अनेक बऱ्या वाईट गोष्टी अनुभवल्या असतील पण ज्ञानेश्वर जाधवर यांनी त्या गोष्टीना पुस्तकात कैद करून त्या आठवणी अजरामर केल्या त्याबद्दल प्रारंभीला त्यांचे आभार. एका मध्यमवर्गीय कुटुंबाची ही कथा लॉकडाऊन मधील अनेक...
पुस्तकाची सुरुवात आंत्रप्रन्योर या शब्दाने होते आणि शेवट Larger than Life या शब्दाने होतो. संपुर्ण पुस्तक वाचल्यावर हाच विचार मनावर ठसतो. लेखक ओळखीचा असल्याने वाचताना पुस्तकातला नायक म्हणून त्याचाच चेहरा सतत आठवत होता. शरदराव माझ्यासाठी एक मित्र म्हणून जेवढे मोठे आहेत त्याहून हे पुस्तक वाचल्यानंतर ते माणूस म्हणून मोठे वाटतात कारण स्वतःची जिंदगी त्यांनी कसलाही फिल्टर न...
ज्ञान आणि अनुभवाच्या उंच शिखरावर बसून सामाजिक भान जिवंत ठेवून काम करणारे प्रख्यात कॅन्सर तज्ञ डॉ.राहुल मांजरे यांची आज सदिच्छा भेट झाली. आजवर आम्ही फक्त फेसबुक मित्र होतोत पण काही दिवसांपूर्वी डॉक्टर साहेब एवढे व्यस्त असतानाही त्यांनी माझ्याकडे वाचनाची इच्छा व्यक्त केली होती जी मी त्यांना माझी दोन पुस्तके भेट देऊन पुर्ण केली. त्याबदल्यात एक प्रचंड भारी...
आजवर तू शेतात साचलास, नदीतून वाहिलास, तुझ्या या वागण्याने पिकांचे नुकसान व्हायचे, कधी घुसलास शहरात तर दुकाने आणि घरांचे नुकसान व्हायचे हे कमी की काय म्हणून आज मात्र तू शेतातून वाहिलास आणि ज्या उदरातून एका दाण्याचे आम्ही शंभर दाणे करायचो ते उदरच वाहून नेलेस की रे. गेलेलं पीक पुन्हा आणता येईल, पडलेले घर पुन्हा बांधता येईल पण...
किती मनिषा असतील तिच्या, अक्षरशः चुरगाळल्या लिंगपिसाटांनी. निर्भया,श्रद्धा,असिफा,प्रियांका आणि आता हाथरस (उत्तर प्रदेश) येथील मनिषावर झालेला अत्याचार पाहून आता असं वाटतं की अशा निषेधाच्या पोस्टचे टेम्प्लेट तयार करून ठेवावे. फक्त पिडीत मुलीचे नाव, गांव आणि अत्याचार करणाऱ्यांची संख्या बदलायची झाली निषेधाची पोस्ट तयार. आता आधी सोशल मीडियावर निषेधाच्या पोस्ट ट्रेंडिंग मध्ये याव्या लागतात मग तेव्हा कुठे मेन...
बायको म्हणजे संस्कार रुपी सिनेमातले हे एक असे पात्र आहे जिला आई, बहीण, प्रेयसी, मैत्रीण, मुलगी, वहिनी, जाऊ, नणंद आणि पत्नी असे वेगवेगळे रोल प्ले करावे लागत असतात. या सगळ्या पात्रांना जी न्याय देते तिचा संसार सुपरहिट होतो. दोस्तांनो तुमचा हा सिनेमा लो बजेट आहे का हाय बजेट याचा फारसा संबंध नसतो फक्त संसारातल्या अभिनेत्रीची निवड मात्र...