© Baby Cheetah | Ball Pen Painting
चित्त्याच्या पिलांना वेग जरी जन्मताच मिळत असला तरी त्या वेगाचा वापर कधी आणि कुठपर्यंत करायचा याचे प्रशिक्षण मात्र आई कडून जन्मानंतर दिले जाते. चित्ता जगातला सर्वात वेगवान प्राणी असला तरी तो सलग खूप वेळ वेगात धावू शकत नाही. शिकार एकदा का आपल्या...
© Baby girl | Ball Pen Painting
जग जिंकलेली अनेक माणसं असतील पण ती सगळी आईच्या उदरात तयार झाली आहेत. स्त्रीचे उदर या विश्वातली एक अद्भुत निर्मिती आहे. अशी निर्मिती करण्याचे सामर्थ्य असणारी मुलगी आपल्या पोटी जन्माला येणे हे भाग्य आहे. मुलीच्या जन्माचे फक्त स्वागतच नाही तर अभिमान बाळगावा...
© Revival | Ball Pen Painting
प्रतिकूल परिस्थितीत उगवलेल्या प्रत्येक व्यक्तिमत्वास हे चित्र अर्पण. मानवनिर्मित दगडी संकटांच्या छाताडावर उभारून मरणाच्या दारात पालवी फुटलेल्या बहाद्दरांना हे चित्र अर्पण. बहुतांशी अवयव निकामी झाल्यावरही जग जिंकलेल्या माणसांना हे चित्र अर्पण आणि कुऱ्हाड हातात घेऊन बसलेल्याला सुद्धा पाणी घालायला प्रवृत्त करणाऱ्या प्रत्येक झाडाला हे...
© Indian Chipmunk | Ball Pen Painting
तिच्या अंगावरचे काळे तांबडे पट्टे आणि झुपकेदार शेपटी ही तिची विशेष ओळख. कोऱ्या कागदावर तिला उतरवताना तिच्यासोबतच्या अनेक आठवणी जाग्या झाल्या. प्रत्येक रेषेगणिस तिच्या इटुकल्या पिटुकल्या उड्या आठवल्या, मागच्या दोन पायावर उभे राहून पुढच्या दोन पायात फळाचा एखादा तुकडा धरून अधून-मधून, खाली-वारी बघत-बघत खाताना...
© Amitabh Bacchan | Ball Pen Painting
लहानपणी माहित झालेला हिंदीतला पहिला हिरो म्हणजेच अमिताभ बच्चन होय. सगळी इंडस्ट्री एकीकडे आणि एकटा बच्चन एकीकडे तरी ते बरोबरीचे वाटतील एवढा प्रदिर्घ अभिनयाचा कालखंड असलेला या शतकातला एकमेव अभिनयसम्राट बच्चन होय. नवी नवती धारण केलेल्या बाॅलिवूडमध्ये अमिताभजी अजूनही भक्कमपणे उभे आहेत. वयाची पंचाहत्तरी...