‘मुलुखगिरी’ पुस्तकाचा दुसरा प्रकाशन सोहळा दि.२७ जून रोजी बार्शीचे प्रथम नागरिक नगराध्यक्ष असिफभाई तांबोळी आणि सामाजिक संघटनांच्या प्रमुख युवा मित्रांच्या शुभहस्ते बार्शी येथे यशस्वीपणे पार पडला. येथील स्मार्ट अकॅडमीचे छोटेखानी सभागृह विचारांच्या तोफांनी भरून गेलं होतं. बार्शीतली विविध क्षेत्रातली मान्यवरांनी सदर सोहळ्यासाठी हजेरी लावली होती.

प्रारंभी सर्व मान्यवरांचा पुस्तक आणि वृक्षभेट देऊन सन्मान करण्यात आला. सुप्रसिद्ध व्याख्याते खंडू डोईफोडे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करून शब्दांच्या ॲटमबाॅम्बची वात पेटवली त्यानंतर जय शिवराय प्रतिष्ठाणचे अध्यक्ष विजय राऊत, छत्रपती ग्रुपचे अध्यक्ष टिंकू पाटील, पत्रकार गणेश गोडसे, फ्री लाब्ररीचे संस्थापक प्रा.संदीप पवार, उद्योगपती योगेश अग्रवाल यांनी शुभेच्छापर खुप सुंदर मनोगते व्यक्त केली.

ABP माझाचे पत्रकार निलेश झालटे यांनी त्यांच्या भाषणातून आमच्या मैत्रीचे बंध उलगडत, लेखनीच्या प्रवासाबद्दल संयमी तरीही तितकेच प्रभावी विचार मांडले, प्रसिद्ध कवी तथा लेखक रामचंद्र ईकारे यांनी मुलुखगिरी या पुस्तकाबद्दल सखोल विश्लेषण करून माझ्या ह्रदयांकित या पुस्तकापासुन रिंदगुड मार्गे मुलुखगिरी पर्यंतचा प्रवास उलगडून सांगितला. बार्शी नगरपरिषदेचे विरोधी पक्ष नेते नागेश अक्कलकोटेंनी माझ्या सोशल मेडीयावरील पोस्टपासुन ते तीन पुस्तके लिहिण्यापर्यंतच्या मुशाफिरीचे विशेष कौतुक करत लेखनीचे महत्व सांगणारी एक सुंदर गोष्ट सांगून उपस्थितांची मने जिंकली.

बार्शी नगरपरिषदेचे नगराध्यक्ष असिफभाई तांबोळी यांनी शहराच्या वतीने माझे अभिनंदन करून ‘Vishal Garad is a golden feather in the crown of barshi taluka’ या शब्दात माझा विशेष उल्लेख करून गौरव केला. अध्यक्षीय भाषणात उपसंपादक सचिन वायकुळे सरांनी त्यांच्या खास शैलित साहित्य, मैत्री आणि प्रेम असा तिहेरी संगम साधून विचार व्यक्त केले.

लेखकाच्या मनोगतात मी माझ्या सर्व मित्रांचे प्रारंभी आभार मानले. मुलुखगिरीच्या निर्मितीचा प्रवास उलगडताना आजच्या युवकांनी ध्येयनिश्चिती करून स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण करायला हवी, समाजमाध्यमांचा योग्य वापर करुन व्यक्त व्हायला हवे, सर्व महापुरूषांचे विचार पेरण्यासाठी प्रबोधन क्षेत्रात यायला हवे असे आवाहन करत यासोबत माझ्या जडणघडणीत वाटा असलेल्या तमाम युवकांबद्धलची भावना व्यक्त केली. सर्व मान्यवरांच्या जबरदस्त भाषणांनी सभागृह दणाणून गेलं. मान्यवरांनी केलेल्या कौतुकाचे रूपांतर प्रेरणेत करून पुन्हा चौथ्या पुस्तकाच्या लिखानाला सुरूवात करणार आहे.

याप्रसंगी वरील उल्लेख केलेल्या मान्यवरांसह शिवराज्य सेनेचे युवराज ढगे, कसबा ग्रुपचे अध्यक्ष श्रीकांत शिंदे, उद्योजक मुकुंद यादव, शिक्षक नेते मुख्याध्यापक विलास वळेकर, लेखक आबासाहेब घावटे, सौ.सुवर्णा शिवपुरे, विवेक गजशिव, डाॅ.धनंजय झालटे, सरपंच गहिणीनाथ गात, सुत्रसंचालक सुरज राऊत, स्वप्निल तुपे, यांसह अनेक मान्यवरांनी प्रकाशनास उपस्थिती लावली.

कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी हनुमंतजी हिप्परकर, युवा लेखक शुभम मिसाळ, सुमित जगदाळे, रामेश्वर लोखंडे आणि रूपेश गरड यांनी विशेष परिश्रम घेतले. भगवंत नगरीतल्या या प्रकाशन सोहळ्या निमित्त उपस्थितांच्या भाषणांतुनच भगवंत पावलाय. आता थोडीशी उसंत घेऊन शब्दांचे बिऱ्हाड डोक्यावर ठेऊन पुन्हा विचार पेरणीला सुरूवात करतोय. तुमचे आशिर्वाद आणि प्रेम असेच अखंड राहो.

वक्ता तथा लेखक : प्रा.विशाल गरड
दिनांक : २७ जून २०१९